शाळा बद्दलची माहिती

शाळेचा इतिहास

गोखले एजुकेशन सोसायटीच्या श्री जयरामभाई विद्यामंदिर प्राथमिक शाळा नाशिकरोड ही मुला-मुलींची शाळेची स्थापना सन १९ जून १९४७ रोजी करण्यात आली. आधी या शाळेचे नाव हे शारदा विद्यामंदिर प्रसारक मंडळ असे होते, त्यानंतर १९८३ मध्ये गो. ए. सोसा. ने हि शाळा ताब्यात घेतली. गोखले एजुकेशन सोसायटीची स्थापना शिक्षण तज्ञ प्रिन्सिपल टी. ए. कुलकर्णी यांनी केली. नाशिकरोड विभागात सदर शाळेची सुरुवात करण्यात आली. नाशिकरोड विभागात सिक्युरिटी प्रेस, करन्सी नोटप्रेस व आर्टिलरी सेंटर मध्ये काम करणारे लोक जास्त आहेत. शाळा स्थापनेच्या वेळी नाशिकरोड विभागात एकही अनुदानित मराठी शाळा नव्हती. नाशिकरोड विभागात नव्हे तर नाशिक तालुक्यात त्यावेळी एकहि मराठी शाळा नव्हती. सामान्य जनता हि त्यावेळी संस्थेने सुरु केलेल्या नाशिकरोड विभागातील पोहोचू शकत होती. सुरुवातीला हि शाळा विना अनुदानित तत्वावर चालवली गेली.

शाळेने यशस्वीरित्या शाळेसाठी वर्ग, मैदान इत्यादी भोतीक सुविधा उपलब्ध करून नविन पिढीला शिक्षण घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली.

विद्यार्थ्यांच्या सर्वात्मिक विकासासाठी शाळा सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे.

शाळेची स्थापना :- सन १९ जून १९४७

शाळेचे देणगीदार :- श्री. जयरामभाई डायाभाई बिटको